Quotes

From the blog

सांग तरंगा

सांग तरंगा मजसी सांग जरा तुझाचि तू की निराचा ह्या खरा ? || धृ || आठव तू तुज पवनाने लोटिले तरंग नावे जळावेगळे केले तेचि नाव तू हृदयी सांभाळिले आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ || अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे सागरासी रे तुझे लाभले लेणे तुजला फिरुनी जणू तेचि की होणे … Continue reading सांग तरंगा

More Blog Articles

Upcoming Events

  • No events

सांग तरंगा

Posted on May 29, 2017

सांग तरंगा मजसी सांग जरा
तुझाचि तू की निराचा ह्या खरा ? || धृ ||
आठव तू तुज पवनाने लोटिले
तरंग नावे जळावेगळे केले
तेचि नाव तू हृदयी सांभाळिले
आता तरी तू जागा होई, साडी भलती तर्हाि || १ ||
अरे जळावरी चंद्राच्या कर्षणे
सागरासी रे तुझे लाभले लेणे
तुजला फिरुनी जणू तेचि की होणे
तुझा शोभला सागरावरी सुंदरसा की तुरा || २ ||
ओंजळीत मी तुजला घेऊ जाता
जळावाचुनी काही ना ये हाता
“तरंग मी” हे, विसरे तू रे आता
“जळ मी आहे” ऐसा ठेका, एकचि लावी सुरा || ३ ||
पाण्यावरती पाण्याची रांगोळी
उन्हात चमके शोभा ही आगळी
आता राहे खुशाल खेळी मेळी
सुखरूपत्वे आनंदाचा अनुभव घेई पुरा || ४ ||


हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

Blog Search