Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • परमामृत १

  Posted on July 2, 2016

  हा ग्रंथ फारसा प्रसिद्ध नाही. जीवनमुक्ती स्थितीतील मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची ही रचना आहे. ते सुद्धा फारसे प्रसिद्ध नाहीत. ज्ञानदेवांच्या पूर्वीचे असून ते मराठीचे आद्य कवी होते. परमार्थाच्या संदर्भातील सुरुवातीची ओवी रचना त्यांनी केली असे मानले जाते. हा ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या पूर्वीचा आहे अशी त्याची एक ख्याति आहे.
  ग्रंथ परिचय :परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. परमामृत म्हणजे असं एक तत्व (अमृत) आहे जे आपल्याला मिळालं / अनुभवाला आलं तर जन्ममृत्युच्या फेर्यआतून आपली सुटका होते. ते तत्व म्हणजे ब्रह्म / आत्मा / संवित / साक्षी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. असं ते तत्व आहेते मी आहे असा जेंव्हा अनुभव येतो तेव्हा जसे ते तत्व आहे तसा मी होतो आणि ते तत्व सद्-रूप, चिद्-रूप ,आनंदरूप असल्यामुळे मी सुद्धा सद्-रूप, चिद्-रूप ,आनंदरूप होतो. सत् सापेक्ष जे असत् उदा. माझं शरीर ते मी नाही असा अनुभव येतो. चित् सापेक्ष जे अज्ञान ते ही मी नाही असा अनुभव येतो. आनंद सापेक्ष जे दु:ख त्याचा माझा काही संबंध नाही हा सुद्धा अनुभव येतो. हा सगळा गोषवारा आहे आणि हा सगळा गोषवारा समजल्यानंतर नेमका आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, काय व्हायचं आहे त्याचा अंदाज येतो.
  वस्तुतंत्र आत्मा :
  आत्मा नावच्या तत्वाला वस्तुतंत्र असं म्हणतात. तो कुणीही तयार केलेला नाही. त्याअर्थी तो कायमचा आहे. त्याचा तो अखंड आहे, तो नाही असं कधीच नाही. करून तयार झालेला असतो म्हणजे करून दिसतं त्याला कर्तृतंत्र म्हणतात आणि त्याचं ते असतं त्याला वस्तुतंत्र म्हणतात. आत्मा वस्तुतंत्र आहे. त्यामुळे मला आत्माचा अनुभव येईल पण मला आत्मा तयार करता येणार नाही. नसलेला आत्मा आणता येणार नाही. अज्ञान कसं नाहीसं करावं हे लक्षात घ्यावं आणि हे लक्षात घेताना काही मूलभूत गोष्टी आहेत. आत्मा वस्तुतंत्र आहे. त्यामुळे कुठून आणायचा नाही, हरवलेला नाही फक्त अज्ञानामुळे तो नाही असं वाटतं. हे अज्ञान ज्याक्षणी दूर होतं त्याक्षणी तो अनुभवाला येतो. नवीन काही अनुभवाला येत नाही, नवीन काही घडत नाही, नवीन कशाची अपेक्षा नाही. कशाची वाट बघायची नाही, काही गोष्टी परमार्थात स्वच्छ नसतील तर आपल्याला त्याचा नीट अंदाज येणं कठीण जाते आणि आपल्याला अंदाज नसला की त्याच्या प्राप्तीसाठी जी साधना करवायाची असते ती नीट करता येत नाही. त्यामुळे असं ते तत्व आहे त्याचा पूर्ण अंदाज असला पाहिजे. असं असं ते आहे, त्याचा अनुभव घ्यायचा असतो. असं झालं की मग गौण परमार्थ, अशुद्ध परमार्थातून आपली सुटका होते.
  अशुद्ध परमार्थ कोणता ?
  कर्म (त्याला वेदविहित निष्काम कर्म म्हणतात.) गौण आहे. कर्माची (गौण परमार्थाची ) रवानगी अशुद्ध परमार्थात करावी लागते. अशुद्ध असला तरी तो पूरक मात्र नक्की आहे. उपासना हे कर्म आहे. यात कृती आहे. श्रवण, कीर्तन,विष्णुस्मरण, पादसेवनं, अर्चनं, वंदनं, दास्यं, सख्यम, आत्मनिवेदनं अशा नवविधा उपासना आहेत. जिथे कृती असते तिथे कर्म असतं, जिथे कर्म असतं ते केलेलं असतं. जे वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही ते काहीही करून मिळणार नाही. कर्माने मिळणार नाही, उपासनेने मिळणार नाही, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, पुराणश्रवण, कीर्तन आणि निरनिराळी पारायणे या कशानेही ते मिळणार नाही. या सगळ्यांची फक्त मदत मात्र त्याला नक्की आहे. मदत ज्याची आहे त्याला फक्त मदतीचा दर्जा आहे हे लक्षात का घ्यायचं? कारण त्यातच रमू नये म्हणून. ज्या गोष्टी कृतीशील असतात त्या कृतीमध्ये रमायला आपल्या सगळ्यांना आवडतं आणि नुसतंच कृतीमध्ये रमायला आवडत नाही तर कृती दिसते. प्रापंचिक माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, आपण जे करतो ते दुसर्या ला कळलं, दुसर्या च्या लक्षात आलं, दुसर्यां नी त्याची तारीफ, स्तुति केली की छान चाललं आहे असं वाटतं. असं आपण खूप खूप केलं, अनेक तीर्थयात्रा केल्या, अनेक व्रतवैकल्ये केली, अनेक पारायनेकेळी आणि असं केलं…केलं …केलं ..असं करतं राहिलो तर फक्त पूरक गोष्ट होणार आहेत, प्रत्येक गोष्टीला एक मूल्य असतं. पण ते मूल्य केव्हातरी संपत. ते मूल्य संपलं आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि त्यानंतर जो पुढचा प्रवास आपल्याला जाणीवपूर्वक, लक्षात ठेवून करावा लागतो. असं जर जाणीवपूरवा, लक्ष ठेवून नाही केला तर पुढचा प्रवास खुंटतो आणि खूप खूप केल्यासारख वाटतं. प्रत्यक्ष काहीही झालेलं नसतं ही मोठी आपत्ती आहे. असं होऊ नये यासाठी खूप जागं असावं लागतं आणि त्यासाठी आपण पुष्कळ विचार करूया.


  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search