Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • पारिभाषिक शब्दांची सूची :- क ते ज

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।।

  अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची

  कर्तृतंत्र – कत्र्याच्या तंत्राने – कत्र्याच्या प्रयत्नानुसार किंवा कत्र्याच्या इच्छेनुसार मिळणारे फळ. कत्र्यावर व क्रियेवर अवलंबून असलेले फळ.

  कर्माचे प्रकार – मनुष्य प्राण्याने कळत न कळत केलेला कोणताही शारीरिक, वाचिक किंवा मानसिक व्यवहार म्हणजे कर्म. कोणीही केव्हाही क्षणमात्र देखील कर्म केल्याखेरीज राहहू शकत नाही. कर्माची विभागणी निरनिराळ्या प्रकारे करता येते.

  अ) सामान्य कर्म – 1) विहित (शुःलकर्म) – करावे म्हणून सांगितलेले. त्यात नित्य, नैमित्तिक, काम्य व प्रायश्चित्त हे प्रकार आहेत. 2) निषिद्ध कर्म (कृष्णकर्म) – करू नये म्हणून सांगितलेले. ब) संचितकर्म, प्रारब्धकर्म व क्रियमाण कर्म –  1) संचित – मी देह, मी कर्ता, अशा बुद्धीने अनंत मनुष्यजन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्मांच्या फलभोगास आरंभ झालेला नाही अशा कर्मांचा साठा. 2) प्रारब्ध – संचितातून ज्या कर्मांच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे अशा कर्मांचा समुदाय. 3) क्रियमाण – सध्याच्या शरीरात केले जाणारे कर्म. मनुष्याला या कर्माच्या बाबतीत स्वातंÍय आहे. त्यामुळे मनुष्यजन्माला कर्मयोनी म्हणतात. येथे देहबुद्धीने केलेली सर्व कर्मे चालू जन्मात अथवा पुढील कोणत्यातरी जन्मात फल देतातच. क) कर्माच्या प्रकारानुसार व्यावहारिक विभागणी – 1) धर्मकर्म (वैदिक कर्म) – संध्या, पूजा वगैरे. 2) व्यवसाय कर्म – उद्योग, व्यापार वगैरे. 3) देहकर्म – व्यायाम, स्वच्छता आदी. 4) कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म – कुटुंब, राष्ट­ वगैरेसंबंधीचे कर्म. 5) अध्यात्मकर्म – श्रवण, ध्यान वगैरे.

  कर्मामुळे ब्रहमज्ञान होत नाही हे निश्चितपणे माहीत हवे. वेदविहित निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते – वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित्कर्मकोटिभिः। (श्रीमत् शंकराचार्य).

  करण – 1) ज्ञानाचे साधन 2) इंद्रिय 3) असाधारण कारण – उदा. घट निर्माण करतांना दंड किंवा चक्र ही साधने फक्त घटाच्या निर्मितीला उपयोगी आहेत, कापड विणण्यासाठी नाहीत. म्हणून दंड व चक्र यांना घटाची असाधारण कारणे किंवा करणे म्हणतात.

  का – जीवनातील घटनांचा क्रम लक्षात घेण्याच्या मानवी प्रवृत्तीतून निर्माण झालेले सापेक्ष तत्त्व. नासदीय सूक्तातील ‘तदानीं’ म्हणजे ‘तेव्हा’ हा शब्द विश्वनिर्मितीच्या घटनेचा काल सुचविणारा शब्द आहे. नव्या विज्ञानानुसार काल हे तत्त्व काल्पनिक आहे. भगवदगीता अ.10, श्लो. 33 नुसार काल ही भगवंताची विभूती आहे. त्या वर्णनावरून काल संकल्पना स्पष्ट होते. ती अशी – भगवंत म्हणतात, अर्जुना, तो (काल) प्रलयकालाच्या अग्नीचाही नाश करतो, सर्व दाही वायूंना गिळून टाकतो, तो आकाशतत्त्वालाही आपल्या पोटात घेऊन नाहीसे करतो. असा जो अपार अनाकलनीय काल आहे तोच मी आहे.

  कीर्तन – स्तुती करणे, कीर्तन करणे.

  कूटस्थ – 1) ऐरण. ज्याप्रमाणे सोनाराच्या ऐरणीवर कितीही दागिने घडले तरी ऐरणीत फरक पडत नाही त्याप्रमाणे अलिप्त असलेला म्हणजे निर्विकार असलेला 2)कूट म्हणजे मिथ्या अशी जी बुद्धी, त्या बुद्धीत ‘स्थ’ म्हणजे असंगरूपाने राहिलेला – आत्मा. जीवपणाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व, भोक्तृत्व, पापपुण्य, सुखदुःख इत्यादी बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. कूटस्थाचे नाहीत.

  कोश -आवरण करणार्‍या पदार्थाला कोश म्हणतात. आत्मा पंचकोशात बंदिस्त असल्यासारखा आहे. बंदिस्त करणार्‍या त्या तत्त्वांना कोश असे म्हणतात. ते पाच प्रकारचे आहेत – 1) अन्नमय – स्थूल शरीरास अन्नमय कोश म्हणतात. 2) प्राणमय – पंच प्राण व पंच कर्मद्रिये यांना प्राणमय कोश म्हणतात. 3) मनोमय – पंच ज्ञानेंद्रिये व संकल्पविकल्पात्मक अंतःकरणाची वृत्ती (मन) यांना मनोमय कोश म्हणतात. 4) विज्ञानमय – पंच ज्ञानेंद्रिये व अंतःकरणाची निश्चयरूप वृत्ती (बुद्धी) यांना विज्ञानमय कोश म्हणतात. 5) आनंदमय – कारणशरीराला आनंदमय कोश म्हणतात. व्यष्टिअज्ञान म्हणजेच कारणशरीर.

  कृतप्रणाश – केलेल्या कर्मांचा भोगावाचून क्षय.

   

  गणेश – गणांचा ईश तो गणेश. गण म्हणजे इंद्रियसमूह. इंद्रियसमूहाचा नियंता असलेला हृदयस्थ ईश्वर.

  गुण – अष्टधा प्रकृतीतील तीन घटक – सत्त्वगुण, रजोगुण व तमोगुण.

  गुणसाम्य – सृष्टीच्या प्रलयानंतरची बीजरूप असलेली सत्त्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था. हिलाच प्रधान असेही म्हणतात.

  गुणक्षोभिणी – सृष्टिनिर्मितीच्या वेळी तीन गुणांच्या साम्यावस्थेत होणारा क्षोभ (संतुलन बिघडणे, कमीजास्त होणे), प्रकृती.

   

  चरमवृत्ती -संपूर्ण चराचरात एकच ब्रहमतत्त्व (चैतन्यतत्त्व) व्यापून आहे अशी निश्चयात्मक अंतःकरणवृत्ती.

  चित्त – पहा अंतःकरण चतुष्टय.

  चिदाभास – अंतःकरणे प्रतिफलितं चैतन्यं चिदाभासः। अंतःकरणात प्रतिबिंबित झालेले जे चैतन्य तो चिदाभास होय. अंतःकरण सत्त्वगुणाचे कार्य असल्यामुळे स्वच्छ व निर्मल आहे. त्यामुळे त्यात ज्ञानरूप कूटस्थ चैतन्य प्रतिबिंबित होते. हे प्रतिबिंब आरशातल्या प्रतिबिंबासारखे नसून कंदिलाच्या काचेत आतील ज्योतीचा प्रकाश जसा फाकतो तसे आहे. अंतःकरण हे पूर्ण शरीरास व्यापून असल्याने चिदाभासही संपूर्ण शरीरास व्यापून असतो.

  चिन्मात्र – केवल ज्ञान, शुद्ध जाणीवेची अवस्था.

  चैतन्याचे प्रकार – वस्तुतः चैतन्य अखंड असल्याने त्याचे प्रकार संभवत नाहीत. परंतु आकलनाच्या सोयीसाठी उपाधीसापेक्षतेने ते मानलेले आहेत – 1) जीवचैतन्य

  2) कूटस्थचैतन्य 3) ईशचैतन्य 4) ब्रहमचैतन्य (हे उपाधिनिरपेक्ष असले तरी पहिल्या तीनच्या संदर्भाने हे उपाधिसापेक्ष आहे.).

  जाणीव – ज्ञानतत्त्व, प्रज्ञान, वृत्तिज्ञान, ज्ञान.

  जीवन्मुक्त – प्रारब्धानुसार जीवन चालू आहे व त्याच वेळी आत्मबोधावर आरूढ झाल्यामुळे अंतःकरण दशा मात्र मुक्ततेची आहे असा सिद्ध पुरुष.

  जीवब्रहमैक्य – जीव आणि ब्रहम यांची मूळचीच असलेली एकरूपता.

  क्रमश: ……


  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search