Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

 • No events
 • पारिभाषिक शब्दांची सूची :- अ ते अ:

  Posted on July 10, 2016

  ।।श्री।।

  अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची

  अंतर्यामी – मनोवृत्तीचा नियामक, जीवात्मा, परमात्मा, वायू, आत राहहून नियमन करणारा ईश्वर.

  अंतःकरणचतुष्टय – कार्यानुरूप असलेल्या अंतःकरणाच्या चार वृत्तींचा समुदाय –

  1) मन – संकल्पविकल्पात्मिका वृत्ती 2) बुद्धी – निर्णयात्मिका वृत्ती 3) चित्त – अवधारणात्मिका वृत्ती 4) अहंकार – अहं अहं (मी मी) असे म्हणावयाला लावणारी वृत्ती.

  अकृताभ्यागम – जे केलेले नाही त्याचे फळ मिळणे. या जन्मी अथवा पूर्वजन्मी न केलेल्या कर्माचे चालू जन्मात फळ मिळणे हा तर्काच्या दृष्टीने एक दोष आहे.

  अखंड – खंड किंवा भाग नसलेला, निरवयव, निरंश, अपरिच्छिन्न.

  अजातवाद – जीव किंवा जग झालेलेच नाही. फक्त ब्रहम आहे ही विचारसरणी.

  अध्यारोपअपवाद – जे जेथे वास्तविक नाही तेथे ते आहे अशी सोयीसाठी कल्पना करणे किंवा त्याची प्रतीती घेणे म्हणजे अध्यारोप. जग आहे व ते निर्माण झाले आहे असे सर्वसामान्यांना खात्रीपूर्वक वाटते. त्यांना पटवून देण्यासाठी तात्पुरते त्यांचे मत स्वीकारून जगाच्या निर्मितीचे स्पष्टीकरण दिले जाते. जे नाही, ते आहे असे स्वीकारणे हा आरोपच असल्याने या पद्धतीला अध्यारोप असे म्हणतात. उदा.- एको@हं बहुस्याम् – मी एकटा आहे, मी अनेक व्हावे अशी ब्रहमाला इच्छा झाली असे म्हणणे हा अध्यारोप. कारण ब्रहम अमन असल्यामुळे त्याला अशी इच्छा होणे शक्य नाही. जग हे ब्रहमाच्या ठिकाणी भासमान होते.

  अपवाद म्हणजे सत्य काय ते सांगणे. जग आहे या भ्रामक प्रतीतीचा त्याग करून फक्त ब्रहमच आहे हा निश्चय करणे. थोडक्य|त, जगाचे मिथ्यात्व समजावून सांगण्यासाठी जगाचे उपादानकारण ब्रहम आहे असा आरोप केला जातो (अध्यारोप). मग श्रुतिप्रामाण्याने त्याचे खंडण केले जाते. यालाच अपवाद करणे म्हणतात.

  अध्यात्म      – 1) देह 2) आत्म्यासंबंधी 3) मन 4) ब्रहम 5) beड्गonging to seड्गf or person 6) the supreme sprit manifested as an individuaड्ग seड्गf 7) Brahma is supreme, its manifestation as an individuaड्ग seड्गf is अध्यात्म 8) जो देहाच्या उत्पत्ती-नाशामुळे उत्पन्न-नष्ट होत नाही असा देहातील कूटस्थ – साक्षी – आत्मा.

  अध्यस्त – ज्या पदार्थाचा भ्रम झालेला असतो तो पदार्थ आणि त्याचे ज्ञान. अध्यस्त पदार्थ प्रत्यक्षात अस्तित्वात नसतो. ज्यावर तो भासतो त्या अधिष्ठानाहून अध्यस्त पदार्थ पूर्णतया वेगळा असतो. तो अधिष्ठानाहून वेगळ्या स्वभावाचा, वेगळ्या रूपाचा व अस्तित्वाच्या वेगळ्या स्तराचा असतो. उदाहरण रज्जू-सर्पाचे आहे. जेव्हा रज्जूवर साप भासतो तेव्हा रज्जू ही व्यावहारिक सत्तेतील असून साप हा प्रातिभासिक सत्तेतील आहे. हा भ्रम अपुर्‍या उजेडात भासमान सर्पाचे अधिष्ठान असलेल्या दोरीचे पूर्ण ज्ञान होऊ न शकल्याने होऊ शकतो. सत्य वस्तू एकच असते. अध्यस्त वस्तू अनेक भासू शकतात. अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्ताची निवृत्ती होते म्हणजेच आरोपित पदार्थ मिथ्या आहे असा निश्चय होतो. याला बाध असे म्हणतात. ब्रहम या अधिष्ठानावर जगत् हे भ्रमाने भासते हे सिद्ध झाल्यावर आरोपित जगाचे मिथ्यात्व आपोआप सिद्ध होऊन ‘ब्रहम सत्यं जगन्मिथ्या’ हा अद्वैताचा परम सिद्धान्त होतो.

  अध्यास – भ्रम – विवर्त (शास्त्रीय नाव). अध्यास हा शब्द श्रीशंकराचार्यांनी वेदान्तसूत्राच्या  भाष्यात उपोद्घातात प्रथम वापरला आहे. आत्मा (ब्रहम) अकर्ता, अभोक्ता आहे असे श्रुती सांगते. पण व्यवहार करतांना प्रत्येक मनुष्य  ‘मी कर्ता, मी भोक्ता, मी हुषार, मी गोरा’ इत्यादी मानतो. त्यामुळे श्रुती आणि प्रत्यक्ष प्रमाण यात येणारा विरोध नाहीसा करण्यासाठी आणि व्यवहाराची सिद्धी होण्यासाठी अध्यास ही संकल्पना स्वीकारली आहे. व्याख्या – अतद् तद्बुद्धि – ज्या ठिकाणी जे नाही ते दिसणे. लौकिकात यालाच भ्रम म्हणतात.

  अदृष्ट – पापपुण्य, संचित.

  अनिर्वचनीय – सत्-असत्हहून वेगळा असलेला बाधयोग्य पदार्थ. बाध होण्यासारखा.  सत् म्हणजे ज्याचा कालत्रयीही बाध होत नाही असा. सताहून विलक्षण म्हणजे सत्च्या लक्षणाशी न जुळणारा वेगळा. असत् म्हणजे जे कधीच अस्तित्वात नसते ते. अशा वंध्यापुत्रासारख्या असत हूनही विलक्षण (वेगळा) असलेला.  उदा. रज्जूवर दिसणारा साप. अज्ञानाचे कार्य असलेला साप व्यावहारिक सत् म्हणावा तर दोरीच्या ज्ञानाने त्याचा बाध होतो आणि वंध्यापुत्राप्रमाणे असत् म्हणावा तर तो प्रत्यक्ष दिसतो. म्हणून हा सर्प सत्-असताहून विलक्षण आहे म्हणजेच अनिर्वचनीय आहे. जगही असेच आहे. ते भासते म्हणून ते असत् नाही व ते निर्माण झाले, आता आहे व पुढे नष्ट होणार आहे म्हणजे ते त्रिकालाबाधित नाही व म्हणून ते सत्ही नाही. म्हणून ज्याच्या स्वरूपाचे निश्चित निर्वचन (वर्णन) करता येत नाही ते. अज्ञानावस्थेत जे सत्य वाटते आणि ज्ञानावस्थेत जे बाधित होते ते अनिर्वचनीय असते. वेदान्तमत जगाला अनिर्वचनीय म्हणजे बाधयोग्य असेच म्हणते.

  अनुग्रह – पूर्णपणे स्वीकार करणे.

  अनुबंध चतुष्ट – 1) शास्त्रीय किंवा पारमार्थिक ग्रंथाची बंदिस्त चौकट. 2) ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो म्हणजे ग्रंथ वाचतांना तो कशा दृष्टीने वाचावा हे कळते आणि समजून घेणे सोपे जाते त्या चार गोष्टी. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध ह्यांना अनुबंध चतुष्टय म्हणतात.

  अन्वय  – यत् सत्त्वे यत् सत्त्वम्। – कार्य आहे म्हणजे कारण हे आहेच. अनु अयं म्हणजे मागोमाग जाणे. शब्दश: अर्थ – जोडणे. फुलांच्या माळेत फुले अनेक असतात. त्यांना एकत्र ठेवणारा दोरा एकच असतो. प्रत्येक फूल जरी वेगळे असले तरी त्या प्रत्येक फुलात दोरा मात्र एकच असतो. म्हणजे दोर्‍याचा फुलांमध्ये अन्वय असतो. माळेचे कारण दोरा आहे. ते काढले तर माळ राहणार नाही. तसे एका आत्म्याचा देहाच्या सर्व अवस्थांमध्ये अन्वय असतो. अवस्था बदलली तरी आत्मा एकच असतो. त्यात काहीही फरक नसतो. त्याच्याच सत्तेवर जीवाचे अस्तित्व अवलंबून असते. ज्याचा अन्वय असतो त्याची स्वतंत्र सत्ता असते, म्हणजे कार्याचे अस्तित्व त्याच्यावर अवलंबून असते.

  अनुमान – वृत्तिज्ञानाच्या सहा प्रमाणांपैकी एक प्रमाण. प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे केलेला तर्क.

  अनुभूती – अनुभव – जीवाचे ब्रहमाशी ऐःय होणे, जीव ब्रहमच आहे असा एकत्वाने अनुभव येणे.

  अनुसंधान – अखंड आत्माकार वृत्ती.

  अनुर्वाच्य – बुद्धिगम्य नसल्यामुळे ज्याचे वर्णन करता येत नाही असे (म्हणजे ब्रहम).

  अपरोक्षज्ञान – जीवब्रहमैक्याचा प्रत्यक्ष अनुभव.

  अभानावरण – अज्ञानाची आवरण शक्ती. ही स्वरूप झाकते व त्यामुळे ‘मला आत्मा माहीत नाही’ (आत्म्याचे भान नसणे) असे वाटते.

  अभाव – नसलेपणा (भाव म्हणजे अस्तित्व. त्याविरुद्ध अ-भाव).

  अभ्युदय – व्यावहारिक वैभव.

  अभिज्ञा – अंतःकरणवृत्तीचा विषयाशी प्रत्यक्ष संबंध आल्याने होणारे ज्ञान.

  िप्त – निर्लेप, असंग, संगरहित.

  अवतार – मूळ स्थितीहून खाली येणे.

  अवस्था -1) जागृती 2) स्वप्न 3) सुषुप्ती 4) तूर्या.

  1) जागृती – ईशनिर्मित सृष्टीशी जेव्हा जीव व्यवहार करतो तेव्हा त्याच्या त्या अवस्थेला जागृती म्हणतात. या अवस्थेच्या अभिमानी जीवाला विश्व म्हणतात. 2) स्वप्न – मनोनिर्मित प्रातिभासिक पदार्थांचा भोग घेणारी जीवाची अवस्था. या अवस्थेच्या अभिमानी जीवाला तैजस म्हणतात. 3) सुषुप्ती – इंद्रिये व अंतःकरण यांच्या लयरूप गाढ निद्रेची अवस्था. या अवस्थेच्या अभिमानी जीवाला प्राज्ञ असे म्हणतात. 4) तूर्यावस्था – तीन देह (स्थूल, सूक्ष्म, कारण), तीन अवस्था (जागृती, स्वप्न, सुषुप्ती), तीन स्थाने (नेत्र, कंठ, हृदय), तीन भोग (स्थूल, प्रविविक्त, आनंदावभास) आणि तीन भोक्ते (विश्व, तैजस, प्राज्ञ) अशा जीवाच्या पंधरा घटकांच्या पलिकडे असलेली, त्यांचे साक्षित्व करणारी अवस्था. या अवस्थेच्या अभिमानी जीवाला प्रत्यगात्मा म्हणतात.

  अव्याकृत – 1) अव्यक्त स्वरूपाचे – ज्ञानेंद्रियांना कळण्याच्या स्वरूपात न आलेले. 2) मायोपाधिक ईश्वर 3) सांख्यांचे प्रधान – सांख्य तत्त्वज्ञानात ब्रहमाव्यतिरिक्त प्रकृती किंवा प्रधान हे जड, स्वतंत्र आणि वेगळे तत्त्व मानतात. सृष्टीला हे कारण आहे असे त्यांचे मत आहे.

  अविद्या – पंचक्लेशांपैकी एक क्लेश. सत्त्वप्रधान प्रकृतीचा मलिन सत्त्वप्रधान (रज आणि तम गुणा ने युक्त) अंश. यालाच व्यष्टि अज्ञान असेही म्हणतात. जागृतीत व्यष्टि अज्ञान बुद्धिरूपाने कळते व सुषुप्तीत ते व्यष्टि अज्ञान याच स्वरूपात असते. ब्रहम, व्यष्टि अज्ञान आणि व्यष्टि अज्ञानात पडलेले ब्रहमाचे (आत्म्याचे) प्रतिबिंब या तिन्हीला मिळून जीव म्हणतात. अविद्येला जीवाचा कारणदेह व पंचकोशातील आनंदमय कोश म्हणतात. ती मलीन सत्त्वप्रधान होऊन जीवाला ‘देह म्हणजे मी’, ‘जग सत्य आहे’, ‘मी कर्ता व भोक्ता आहे’  असे देहतादात्म्य निर्माण करून संसारात बद्ध करते. अविद्या ही जीवाला व्यापक ब्रहमापासून वेगळे बनविणारी उपाधी आहे. जीवाच्या पारमार्थिक ब्रहमस्वरूपावर ती आच्छादन करते.

  ष्टधा प्रकृती – पंचमहाभूते + त्रिगुण; पंचमहाभूत + मन + बुद्धी + अहंकार.

  अरत्र – इहलोक

  असत् – कधीही अस्तित्वात नसणारे. अभावरूप. उदा. आकाशपुष्प, सशाचे शिंग वगैरे.

  असत्त्वावरण – आत्म्याचे अस्तित्व जाणवू न देणारे अज्ञानाचे आवरण (आत्मा नाही अशी भावना करणारे आवरण).

  असंग – संगरहित, निर्लेप.

  अहंकार – 1) अंतःकरणाची एक वृत्ती. 2) मी म्हणजे विशिष्ट व्यक्ती आहे अशी जाणीव 3) गर्व – सामान्य व्यवहारात गर्वाला अहंकार म्हणतात. 4) व्याख्या – अहं अहं कारयति इति अहंकारः। विमल ब्रहमावर मी आहे’ ही अहंवृत्ती उठली व सृष्टीनिर्मितीला सुरुवात झाली. मलीन अहंकाराच्या आवरणामुळे जीव वस्तुतः ब्रहम असून स्वतःला त्याहहून वेगळा मानू लागला.

  योगवाशिष्ठात अहंकाराचे तुच्छ, शुभ आणि परम असे तीन प्रकार सांगितले आहेत. 1) तुच्छ अहंकार – मी स्थूल देह आहे. 2) शुभ अहंकार – मी सूक्ष्म देह आहे. 3) परम अहंकार – मी ब्रहम आहे (अहं ब्रहमास्मि).

  आगम निगम – श्रुती व स्मृती.

  आत्मनिवेदन – आत्म्याच्या ठिकाणी ‘स्व’चे केलेले संपूर्ण विलीनीकरण.

  आत्मा (आत्मन्) – आत्मा हा शब्द वेदान्तशास्त्रातील ग्रंथात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या अर्थाने वापरला आहे. संदर्भानुसार त्याचा अर्थ लावून घ्यावा लागतो. त्याचे खालील अर्थ आहेत. 1) ब्रहम 2) व्यष्टिपरिच्छिन्न जीवात्मा 3) कूटस्थ 4) देह 5) बुद्धी

  6) महत्तत्त्व 7) स्वरूप 8) स्वभाव.

  आत्यंतिक निवृत्ती – कार्याची कारणासह निवृत्ती.

  आधार व अधिष्ठान – भ्रम झाला असतांना ज्यावर भ्रम होतो, त्याचे सामान्य रूप (सत् – अस्तित्व) हे भ्रांतिज्ञानाशी एकरूप होऊन तो अध्यस्त पदार्थ सत्य आहे असे वाटते. या सामान्य रूपाला आधार म्हणतात. ब्रहमाचे सत् हे सामान्य रूपच जगताचा आधार आहे. भ्रमज्ञानकाली पदार्थाचे विशेष रूप झाकले जाते आणि विशेषरूपाचे ज्ञान झाले की भ्रमच नाहीसा होतो. या विशेषरूपालाच अधिष्ठान असे म्हणतात.

  आनंद – कशावर वा कोणावरही अवलंबून नसलेले सुख.

  आप्तवाःय – आप्तस्तु यथार्थ वक्ताहू। आप्ताचे वचन

  आरंभवाद – सृष्टिनिर्मितीची प्रक्रिया सांगणारी एक विचारसरणी. यानुसार एका पदार्थापासून दुसरा वेगळाच पदार्थ निर्माण होतो. जसे सुतापासून वस्त्र. या मतानुसार ब्रहमापासून जग असेच निर्माण झाले असून ते सत्य आहे.

  आसक्ती – पूर्ण लिप्तता (आत्यंतिक ममत्व).

  ंबन – निर्गुण-निराकार ब्रहमोपासनेसाठी सोय म्हणून स्वीकारलेली सगुण साकार ब्रहमाची  (म्हणजे ईश्वराच्या अवताराची) विविध प्रतीके.

  आवरण – मनुष्याच्या अंतःकरणातील तीन दोषांपैकी एक. (इतर दोष – मल, आणि विक्षेप) अज्ञानाच्या आवरणामुळे प्रथम विक्षेप व नंतर मल निर्माण होतो.

  ओषधी – एकदाच फळ देऊन नाश पावणारी वनस्पती. उदा. गहहू, भात, मका, केळी इ.

  ईश्वर – सगुण-निराकार तत्त्व. ईश्वर केवळ तर्काने व शास्त्राने सिद्ध होतो. ब्रहम, शुद्धसत्त्वगुणप्रधान माया व त्यात पडलेले ब्रहमाचे प्रतिबिंब हे तीन मिळून ईश्वरतत्त्व तयार होते (मायाविशिष्ट साभास चेतन). शुद्धसत्त्वप्रधान मायेमुळे ईश्वर मायेच्या आधीन असत नाही. ईश्वर हा सर्वशक्ती, सर्वज्ञ, विभू (व्यापक), ईश म्हणजे सर्वांचा प्रेरक-नियामक, स्वतंत्र म्हणजे कर्माधीन नसलेला, परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष, मायी म्हणजे माया ज्याच्या स्वाधीन आहे असा, आणि बंधमोक्षरहित असा तो आहे. तो जगाचे निमित्त कारण आहे. माया ही ईश्वराची उपाधी आहे. ईश्वर हा ‘तत्त्वमसि’ मधील तत् पदार्थाचा वाच्यार्थ आहे.

  ईश्वरतनुचतुष्ट – ईश्वराचे चार देह – 1) विराट 2) हिरण्यगर्भ 3) ईश्वर 4) अव्याकृत (माया).

  ईशसृष्ट – ईश्वराने निर्माण केलेली सजीव व निर्जव सृष्टी.

  ईषणा – तीव्र वासना. मुख्य तीन ईषणा – लोकेषणा, वित्तेषणा, दारेषणा.

   

  उदास – 1) आशा नाहीशी झालेली असून नैराश्य (दुःख) मात्र अजिबात नसलेला. 2) ज्याला कसलीही इच्छा राहिलेली नाही असा.

  उन्मनी – काहीजण हिला अवस्था म्हणतात. द्वैताचा अनुभव देणारे मन शिल्लक न राहिल्यामुळे आलेला अद्वैताचा अनुभव, तूर्या अवस्था परिप¹ झाली की तीच उन्मनी म्हटली जाते. जीवब्रहमैःयाची अवस्था. जीवन्मुक्त या अवस्थेत अधिक असतो.

  उपरती – 1) आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने केलेला गृहादिकांचा वस्तुत्याग वा संगत्याग  2)बाह्यविषयांपासून पराड्ग्मुख होणे.

  उपहित – उपाधीमुळे वेगळा पडलेला भाग.

  उपाधी – 1) जी वस्तू जेवढी जागा व्यापते तेवढçाच जागेतील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते तिला उपाधी म्हणतात. उदा. घटाकाश. या ठिकाणी घटात असलेल्या आकाशाला व्यापक आकाशापासून घट वेगळा करतो व त्याचे ‘घटाकाश’ असे वेगळेपणाने ज्ञान करून देतो पण घटाचे गुणधर्म घटातील आकाशात नसतात. उपाधी आपले धर्म उपहितावर लादत नाही. त्याला इतर वस्तूंपासून फक्त वेगळा करून दाखविते. 2) एक प्रकारची शक्ती, जी स्वतःशी संबंधित पदार्थास मूळ रूपापासून हटवून निराळ्या रूपाचा बनविते. घटाचा आकाशाशी संबंध आल्याने त्याला घटाकाश असे नाम व रूप मिळाले. 3) कारण.

  उपासना – समान प्रत्ययाचा तैलधारेप्रमाणे अखंड प्रवाह (चित्ताने तेलाच्या धारेसारखे अखंड एकाच वस्तूचे चिंतन करणे) – अनुसंधान, पूजा, अभ्यास, चिंतन, ज्ञानप्राप्तीचे बहिरंग साधन. वेदविहित निष्काम उपासनेने चित्त शांत होते (स्थिर होते).

  उपादान कारण – ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्यावाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. उदा. माती हे घटाचे उपादान कारण आहे. सोने हे दागिन्याचे उपादान कारण आहे.

  क्रमश: ……


  हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

  Blog Search