Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

  • No events
  • पारिभाषिक शब्दांची सूची :- य ते ज्ञ

    Posted on July 10, 2016

    ।।श्री।।

    अध्यात्मशास्त्रातील काही पारिभाषिक शब्दांची सूची

    योग – 1) युज् म्हणजे जोडणे. जीवाला ब्रहमाशी जोडणारी प्रक्रिया. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग अशाअनेक प्रक्रिया आहेत. 2) जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती म्हणजे योग.

    यचिंतन – ब्रहमाभ्यासास उपयुक्त अशी एक प्रक्रिया. कार्याचा कारणात लय करविणारे मनन हे लयचिंतनाचे स्वरूप आहे. तैत्तिरीय उपनिषदात विश्वनिर्मितीचा क्रम आत्र्मा

    आकाश – वायू – अग्नी –जल – पृथ्वी- ओषधी – अन्न – पुरुष (प्राणी शरीरे) असा आहे. या सरणीत पुढील प्रत्येक घटक त्याच्या आधीच्या घटकाचे कार्य आहे आणि मागील घटक हा पुढील घटकाचे कारण आहे. आत्मा सर्वांचे मूळ कारण आहे. तो कोणाचेच कार्य नाही. कार्य हे कारणरूपच असते या नियमाचे चिंतन करून पुरुषाचा अन्नात, अन्नाचा ओषधीत याप्रमाणे लय करीत जाणे म्हणजे शेवटी परमकारण असा आत्माच उरेल. त्याचे अनुसंधान करावे.

    यरूप निवृत्ती -कार्याची कारणामध्ये जी निवृत्ती तिला लयरूप निवृत्ती म्हणतात.

    यसाक्षित्व – सर्व दृश्य पदार्थांचा व कल्पनांचा अभाव पाहणे.

    क्षण – ज्ञान करून देणारे, सुचविणारे. अध्यात्मशास्त्रानुसार असाधारण धर्म – जो धर्म अन्य कोणत्या पदार्थात नसून एका विशिष्ट पदार्थामध्येच असतो तो. लक्ष्यास (लक्षणावरून जाणण्यास योग्य) सजातीय आणि विजातीय पदार्थांपासून अलग करणे हे लक्षणाचे प्रयोजन (कारण) आहे. तटस्थ लक्षण – जे लक्षण लक्ष्याच्या ठिकाणी सतत राहणारे नसून काही काळ असते ते. ब्रहम जेव्हा मायेचे अधिष्ठान होते तेव्हाच ते जगाच्या उत्पत्ती-स्थिती-लयाचे कारण होते. इतर वेळी असे म्हणता येत नाही म्हणून जगाची उत्पत्ती-स्थिती-लय यांचे कारणत्व हे ब्रहमाचे तटस्थ लक्षण आहे. स्वरूप लक्षण – स्वरूपं सत् व्यावर्तकं स्वरूपलक्षणम्। जे लक्षण लक्ष्याचे स्वरूप असून त्याला इतर पदार्थांहहून वेगळे करते ते. सत्, चित्, आणि आनंद हे तीन धर्म ब्रहमाचे स्वरूप लक्षण आहेत.

    क्षणा – ऐकलेल्या वाक्यावरून विपरीत बोध होत असेल तर ते वाक्य बोधाशी सुसंगत जुळवून घेणे. तीन पद्धतीने लक्षणा केली जाते. 1) जहत् 2) अजहत् 3) जहदाजहत् (भागत्याग).

    क्ष्यार्थ – ज्या वाःयाचा अर्थ शब्दाच्या शक्तिवृत्तीने जुळत नसेल त्या ठिकाणी लक्षणावृत्तीने अर्थ घ्यावा लागतो. त्याला लक्ष्यार्थ म्हणतात. खरे अप्रगट स्वरूप (लक्ष्यांश).

    वाच्यार्थ – शब्दाच्या शक्तिवृत्तीने जो अर्थ घेतला जातो त्याला वाच्यार्थ म्हणतात. वरवर दिसणारा अर्थ.

    वाद – तत्त्वज्ञानार्थ केलेली चर्चा; जगाकडे पाहण्याची दृष्टी, स्पष्टीकरण. अजातवाद, विवर्तवाद, बिंबप्रतिबिंबवाद, दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद  वगैरे जगाची उत्पत्ती सांगणारे अनेक वाद प्रसिद्ध आहेत. 1) अजातवाद – जीव किंवा जग झालेलेच नाही. फक्त ब्रहम आहे. 2) विवर्तवाद – ब्रहमावर जगाचा केवळ भास होतो, रज्जूसर्पाप्रमाणे. 3) बिंबप्रतिबिंबवाद – आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे ब्रहमाचे प्रतिबिंब म्हणजे जीव. 4) दृष्टीसृष्टीवाद – जोपर्यंत दृष्टी आहे म्हणजे पदार्थ समोर आहे तोपर्यंतच त्या पदार्थाला अस्तित्व आहे. 5) सृष्टीदृष्टीवाद –  सृष्टी आहे म्हणून दृष्टीला दिसते.

    वासना – संस्कार; प्रवृत्तीमागे (वर्तन किंवा क्रियेमागे) असलेली प्रेरणा; कर्म,  इच्छा इत्यादींचे दृढ झालेले संस्कार. वासना मुख्यतः दोन प्रकारची आहे. 1) मलीन वासना किंवा कुवासना – ब्रहमाच्या स्वरूपाला झाकणार्‍या अज्ञानामुळे देहतादात्म्य व जगत्सत्यत्व भ्रांती होते. त्यामुळे ही वासना अत्यंत बलवान होते आणि तिच्या पूर्तसाठी पुनर्जन्म घेण्यास भाग पाडते. 2) शुद्ध वासना किंवा सुवासना – जी वासना ब्रहमस्वरूपाच्या ज्ञानाकडे नेते. भाजलेली बी जशी अंकुरत नाही पण खाण्यासाठी उपयोगी पडते, त्याप्रमाणे जी वासना पुनर्जन्माचे मूळ खुडून टाकून केवळ प्रारब्धभोगासाठी देह सांभाळते व जिच्या योगाने अखंड, एकरस, आनंदरूप वस्तूचा साक्षात्कार होतो ती वासना.

    वस्तुतंत्र – जो धर्म वस्तूच्या स्वाधीन असतो व ज्याच्या निर्मितीसाठी अन्य कोणाची गरज नसते. उदा. सूर्याची उष्णता वस्तुतंत्र आहे मात्र निखार्‍याची उष्णता कोळसा पेटवून कोणाला तरी उत्पन्न करावी लागते म्हणजे ती कर्तृतंत्र आहे. याचप्रमाणे आत्मज्ञान वस्तुतंत्र असून पदार्थज्ञान कर्तृतंत्र आहे. आत्मज्ञान निर्माण करावे लागत नाही. त्याच्या आड येणारे दोष गेले की ते असतेच.

    वाणी – वाणीचे चार प्रकार – वैखरी, मध्यमा, पश्यन्ती, परा. 1) वैखरी – कानांना ऐकू येईल असे शब्द जिव्हेद्वारे बोलते, 2) मध्यमा – मनात शब्द येतात पण मोठçाने बोलले जात नाहीत, 3) पश्यन्ती – अर्थ माहीत असतो पण त्याला शब्दरूप नसते,  4) परा – केवळ स्फुरण.

    विधी-निषेध – करा व करू नका अशा धर्माज्ञा.

    विराग – राग = आसक्ती. विराग = आसक्ती नसणे.

    विवर्त – वि म्हणजे विपरीत. वृत् = वर्त म्हणजे दिसणे. एक असतांना एक भासणे. अधिष्ठानाहहून विपरीत स्वभाववान आणि अन्यथारूप, त्याला विवर्त म्हणतात. उदा. दोरीवर सर्प भासणे.

    विषय – विषुन्वति इति विषयः। म्हणजे जो जखडून टाकतो तो विषय. पंचज्ञानेंद्रियांनी मनाला जाणवणार्‍या – कळणार्‍या वस्तू. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचज्ञानेंद्रियांमुळे कळतात. तर्क, कल्पना वगैरेंच्या सहाæयाने कळणार्‍या वस्तू मनबुद्धीमुळे कळतात. या सर्वांना विषय म्हणतात.

    विज्ञान – 1) आत्मज्ञानाला आलेली स्थिर अवस्था 2) चिरंतन सत्य (ज्ञान) ज्या कारणांनी आणि ज्या पद्धतींनी भासते त्याचे ज्ञान. विश्वरचनेचे आणि उत्पत्ती-लयाचे ज्ञान.

    वैराग्य – आसक्ती नसलेली अवस्था.

    व्यतिरेक – यदाभावे यत् अभावम्। कारणच नाही तर कार्य नाही. तोडणे, मागे टाकणे, वेगळे करणे. माळेमध्ये सर्व फुलात एकच दोरा व्यापून असतो. तेथे फुलात दोर्‍याचा अन्वय असतो पण प्रत्येक फुलाची दुसर्‍या फुलापासून भिन्नता असते म्हणजे त्यांचा परस्पर व्यतिरेक असतो. तसेच जीवाच्या सर्व अवस्थात आत्म्याचा अन्वय असतो पण एक अवस्था दुसर्‍या अवस्थेत नसते. हा त्या अवस्थांचा परस्परांशी व्यतिरेक म्हटला जातो. ज्याचा व्यतिरेक असतो त्याची परतंत्र सत्ता असते म्हणजे ज्याचा अन्वय असतो, त्यावर तो पदार्थ अवलंबून असतो.

    वृत्ती – विषयांचे ज्ञान करून देणारा (विषयप्रकाशक) अंतःकरणाचा परिणाम (बदल). संशय (मन), निश्चय (बुद्धी), स्मरण (चित्त), गर्व (अहंकार) यांनाही अंतःकरणाच्या वृत्तीच म्हणतात. अंतःकरणात अनेक वृत्ती (तरंग) निर्माण होतात व नाश पावतात. पण एकावेळी एकच वृत्ती असते. स्थूलबुद्धिवृत्ती – जी बुद्धिवृत्ती निर्ण य करण्याच्या प्रक्रियेत असते ती. सूक्ष्मबुद्धिवृत्ती – ज्या बुद्धिवृत्तीचा निर्ण य झाला आहे ती. ही जाणीवेत येत नाही.

    व्युत्थान – समाधीतून उठणे किंवा जागे होणे.

    शरीर – शीर्यते इति शरीरं। जे क्षय पावते ते.

    शास्त्र – माहीत नसलेले माहीत करून देते ते.

    षड्विकार – अ) जे जे निर्माण होते त्याला सहा विकार असतात. ते असे – 1) सत्ता – बीजरूपाने अस्तित्व 2) जन्म 3) वृद्धी 4) परिणाम – बदल, विकास 5) अपक्षय – र्‍हास 6) विनाश. ब) मनाचे सहा विकार – 1) काम 2) क्रोध 3) लोभ 4) मोह 5) मद 6) मत्सर.

    संकल्पना – सम्यक् कल्पना. सम्यक म्हणजे संपूर्ण, सर्वांगीण. सर्वांगीण बोध, समग्र अर्थ.

    संग – वस्तूला मनाने चिकटणे.

    संबंध – संयोग, जोडणे. हा चार प्रकारचा आहे. 1) संयोगसंबंध – दोन सावयव द्रव्यांचा काही काळ टिकणारा संबंध. उदा. पक्षी व फांदी यांचा संबंध. 2) समवाय संबंध – दोन सावयव द्रव्यांचा अखंड संबंध – या संबंधातून तिसराच पदार्थ बनतो. उदा. अनेक तंतूंचा संबंध आल्यावर कापड निर्माण होते. 3) तादात्म्य संबंध – दोन सावयव द्रव्ये एकच आहेत असे वाटणे. उदा. तापलेले लोखंड अग्नीरूप झाल्यासारखे वाटणे 4) आध्यासिक संबंध – प्रत्यक्ष संबंध नसतांना भ्रमामुळे संबंध आहे असे वाटणे. उदा. आत्मा व शरीर यांचा संबंध.

    संत – सत् = जे नेहमी असते, नाही असे कधी होत नाही.

    संवित् – शुद्ध ज्ञान, विमल ब्रहम, ज्ञप्तिमात्र, सर्वप्रकाशक.

    सकाम – फळाच्या अपेक्षेने केलेले कर्म.

    सगुण – एका किंवा तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेला. उदा. जगत् – तमोगुण, ईश्वर – शुद्धसत्त्व, जीव – त्रिगुणात्मक.

    सत्संग – सत् ला चिकटून राहणे. सत्पुरुष किंवा सद्ग्रंथांचा सहवास.

    सत्ता – विद्यमानता, अस्तित्वाचा स्तर, अनुभवाची कक्षा. सत्ता ही पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक अशी तीन प्रकारची आहे. ब्रहमाची पारमार्थिक सत्ता आहे कारण ती तिन्ही काळात बाधित होत नाही. पंचमहाभूते व त्यांचे कार्य यांची व्यावहारिक सत्ता आहे कारण व्यवहारकाळी तिचा बाध होत नाही. ही फक्त तत्त्वज्ञानानेच बाधित होते. रज्जूवर भासणार्‍या सर्पाची किंवा स्वप्नातील पदार्थांची जी सत्ता, ती प्रातिभासिक सत्ता. ती अधिष्ठानज्ञानाने नाश पावते. शास्त्रदृष्ट्या विचार करता दोनच सत्ता आहेत. 1) पारमार्थिक व 2) प्रातिभासिक. व्यावहारिक सत्ता हा प्रातिभासिक सत्तेचाच भाग आहे कारण दृश्य जग हे पंचमहाभूतांचे कार्य असल्यामुळे ते मायिकच आहे. अधिष्ठान असलेल्या ब्रहमाच्या ज्ञानाने ते असून नसल्यासारखे होते. त्याचा बाध होतो.

    सन्मात्र – सत् + मात्र. सत् म्हणजे असणारे, खरे, अस्तित्व, सत्यवस्तू. मात्र म्हणजे केवळ, फक्त. सन्मात्र म्हणजे केवळ अस्तित्व, शुद्ध अस्तित्व.

    सनातन – शाश्वत – चिरकाल टिकणारा, ब्रहमाचे विशेषण, अखंड अस्तित्व.

    समाधान – 1) मनाची एकाग्रता झाली असतांना जी स्थिती प्राप्त होते तिला समाधान म्हणतात. 2) तृप्ती.

    समाधी – 1) निदिध्यासनाची परिप¹ अवस्था 2) अष्टांगयोगाचे अष्टम अंग 3) ध्येय वस्तूचे ध्यान करतांना स्वतःची विस्मृती होणे. समाधीचे सबीज आणि निर्बज असे दोन प्रकार आहेत. धारणेतील समाधी सबीज असून अंतिम साध्यस्वरूपी समाधी निर्बज असते. पतंजलींच्या मते सबीज समाधीतून निर्बज समाधी व त्यातून कैवल्य असा समाधीचा उत्कर्ष आहे.

    समानाधिकरण -सामानाधिकरण्य – अधिकरण म्हणजे स्थल, काल. समान अधिकरण म्हणजे दोन किंवा अधिक वस्तूंचा एकच आश्रय. जेव्हा दोन वस्तूंचा संबंध सांगणे हा हेतू गौण असतो व ऐःय सांगणे हा मुख्य हेतू असतो तेव्हा ‘समानाधिकरण’ हा शब्द वापरतात. जेव्हा दोघांमधला संबंध प्रस्थापित करायचा असतो तेव्हा ‘सामानाधिकरण्य’ हा शब्द वापरतात. 1) मुख्य समानाधिकरण – ज्या वस्तूचा ज्या वस्तूशी सदैव अभेद असतो, त्याचे त्याच्याशी मुख्य समानाधिकरण असते. उदा. कूटस्थ आणि ब्रहम, घटाकाश आणि महाकाश यांचे मुख्य समानाधिकरण आहे. 2) बाध समानाधिकरण – ज्या वस्तूचा बाध होऊनच दुसर्‍या वस्तूशी अभेद होतो, तिचे दुसरीशी बाध समानाधिकरण असते. उदा. चिदाभास आणि कूटस्थ. चिदाभासाचा बाध होऊनच त्याचे कूटस्थाशी ऐक्य होते.

    सहजस्थिती – साधकावस्था संपून आत्मज्ञानाला आलेली सहजावस्था.

    सापेक्ष – अवलंबून असणारे, संबद्ध. उदा. सुख हे विषयसापेक्ष आहे परंतु आनंद हा कशावरही अवलंबून नसल्याने विषयनिरपेक्ष आहे.

    साधक – साधना करणारा, वेदान्त शास्त्राचा अभ्यासक, ईश्वरप्राप्तीसाठी तसेच मोक्षासाठी प्रयत्न करणारा.

    साध्य – जे मिळवावयाचे आहे ते.

    साधू – शुद्ध मनाचा, मनाचे सर्व विकार ज्याने धुऊन काढले आहेत व त्यामुळे ज्याचे मन अत्यंत शुद्ध झालेले आहे असा.

    साक्षात्कार -प्रत्यक्ष ज्ञान किंवा अनुभव, ब्रहमरूप होणे. येथे साक्षात् आकार अभिप्रेत नाही तर ब्रहमरूप होऊन राहणे अभिप्रेत आहे.

    साक्षीभास्य – साक्षी म्हणजे आत्मा. तो ज्या पदार्थांचे अविद्यावृत्तीद्वारा प्रकाशन करतो त्या पदार्थांना साक्षीभास्य म्हणतात.

    साक्षेप – प्रयत्न.

    सिद्ध – मूळ धातू सिध् = साध्याप्रत पावणे, यशस्वी होणे, जिंकणे. ज्याने आपले ध्येय जिंकले, ज्याला संपूर्ण आत्मज्ञान झाले, ज्याचे अज्ञान समूळ नष्ट झाले तो.

    सुख – अनुकूल संवेदन म्हणजे सुख.

    स्मृती – पौरुषेय वाड्ग्मय, हेतु पुरस्रर व विचारपूर्वक  रचना केलेले धर्मग्रंथ. उदा. भगवदगीता, 18 पुराणे, मनुस्मृती, पाराशरस्मृती इ.

    स्वसंवेद्य – पाच ज्ञानेंद्रिये व सहा प्रमाणे (काहींच्या मते 9 प्रमाणे) यांनी न जाणले जाणारे, ब्रहमाचे विशेषण, केवळ स्वतःच स्वतःला जाणणारे नव्हे तर ज्ञान हेच ज्याचे रूप आहे असे.

    त्र

    त्रिकााबाधित -तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही ते. नित्य, कायमचे.

    त्रिपुटी – एखाद्या व्यवहारासाठी मुळात एकच असलेल्या ब्रहमवस्तूने त्रिधा व्हावे लागते. तीन घटकांच्या या समूहाला त्रिपुटी म्हणतात. ज्ञाता-ज्ञान-ज्ञेय ही आद्य त्रिपुटी होय. संपूर्ण सृष्टी आणि तिच्यातील सर्व व्यवहार म्हणजे केवळ त्रिपुटयांची क्रीडा आहे. त्रिपुटीलय झाल्याशिवाय जीवब्रहमैःयाचा अनुभव शक्य नाही. कारण जोपर्यंत त्रिपुटी आहे तोपर्यंत द्वैत आहे.

    श्र

    श्रद्धा – जीवब्रहमैःयविद्येचा उपदेश करणारे श्रीगुरू व वेदान्तवाःय यांच्या वचनावरील अढळ विश्वास.

    ज्ञ

    ज्ञान – पदार्थज्ञान, विज्ञान – ब्रहमज्ञान. 1) अपरोक्षज्ञान – जीवब्रहमैःयाचा प्रत्यक्ष अनुभव 2) निर्विशेषज्ञान – ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान या त्रिपुटीलयानंतर आलेला ज्ञानरूप ब्रहमवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव 3) परोक्षज्ञान – अप्रत्यक्ष ज्ञान. शास्त्रीय ग्रंथांच्या श्रवणाने, वाचनाने झालेले परंतु प्रत्यक्ष अनुभव न आलेले ज्ञान. 4) सविशेषज्ञान – कोणाचे तरी किंवा कशाचे तरी (ज्ञेय) कोणाला तरी (ज्ञाता) झालेले ज्ञान (त्रिपुटी असलेले)

    ज्ञान आणि विज्ञान हे दोन शब्द निरनिराळ्या ग्रंथकारांनी निरनिराळ्या अर्थाने वापरले आहेत. फक्त ज्ञानेश्वरीत विज्ञान हा शब्द पदार्थज्ञान व ज्ञान हा शब्द ब्रहमज्ञान ह्या अर्थ वापरला आहे. व्युत्पत्तीप्रमाणे तोही बरोबरच आहे. इतर ग्रंथ वाचतांना विज्ञान हा विशेष ज्ञान किंवा ब्रहमज्ञान ह्या अर्थाने व ज्ञान हा शब्द पदार्थज्ञान ह्या अर्थाने घ्यावा. असा संदर्भ लक्षात घेऊन वाचन केले नाही तर गोंधळ होण्याचा संभव असतो.

    समाप्त .

    अद्वैत मकरंद मधून…..


    हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

    Blog Search