Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

  • No events
  • प. पू. डॉक्टर श्रीकृष्ण द. देशमुख

    प. पू. डॉ. काका

    “कुलं पवित्रं जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन |
    अपारसंवित्सुखसागरेSस्मिन लीनं परे ब्रहमणि यस्य चेत: || ”

    • जन्म :- ज्येष्ठ अमावस्या शके १८५६ म्हणजे दि ११ जुलै इ स १९३४ ह्या शुभ दिनी. कोकणातील तळे गाँव येथे झाला.
    • पुढे यथा समय वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले.
    • मुरगुड ग्राम, त्याचा परिसर आणि तेथील रहिवासी जनता यांच्या थोर भाग्याने प पू डॉ काकांनी हा विभाग व हे ग्राम यांची स्वत:ची कर्मभूमी म्हणून निवड केली. एक यशस्वी, दयाळू, सेवाभावी, लोकप्रिय व तज्ज्ञ डॉक्टर म्हणून पंचक्रोशीत प्रख्याती अशा व्यावसायिक ऐश्वर्याचा त्यांना लाभ झाला. प्रारब्ध, क्रियमाण व श्रेष्ठांचे आशीर्वाद ह्या अति अनुकूल कारणत्रयामुळे संतती, संपत्ति, लोक मान्यता, लोकप्रियता, सुकीर्ती, सुप्रसिद्धी, गौरव आणि शासकीय तसेच सामाजिक पुरस्कार व सन्मान ह्या दुर्लभ अलौकिक बाबींनी त्यांचे लौकिक जीवन लाभान्वित झाले आहे. स्वत: डॉ काका व त्यांच्या सहधर्मचारिणी कै वसुंधरा ह्या उभयतांच्या दीर्घ आणि आदर्श वैवाहिक जीवनाचे थोडक्यात वर्णन पुढील प्रमाणे करता येईल. “सहवास , सहजता, सहधर्म व सहकार्य या सद्गुणांनी मंडित अखंड सुमधुर रसमय सुखी सहजीवन”
    • १९७५ साली प पू खंदारकरमहाराजांशी भेट. त्यांचा अनुग्रह प्राप्त.
    • १९८१ साली प पू काकांना अनुग्रह दीक्षा व संप्रदाय वाढवण्याची आज्ञा झाली.
    • वयाच्या ५२व्या वर्षी उत्तम सुरू असलेला वैद्यकीय व्यवसाय सहकार्याच्या हाती सोपवून निवृत्ती.
    • अगदी सुरवातीच्या काळात पत्रद्वारा दासबोध अभ्यास ह्या उपक्रमाचे सहासंयोजक म्हणून काम पाहिले.
    • २००३ साली कोल्हापूर येथील यादव मठाने ज्ञानभूषण ह्या बिरुदाने सन्मानित केले
    • ब्रह्मीभूत वरदानंद भारती स्वामी महाराज स्मृती कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभात, दिनांक १६/०१/२००४ रोजी अखिल भारतीय कीर्तन कुलाच्या ठाणे जिल्हा शाखे तर्फे “समाजभूषण पुरस्कार” व सन्मानपत्र बहाल करण्यात आले.
    • गेली २८ वर्षे अखंड सज्जनगडावर पितृपंधरवडयात सात दिवासीय अभ्यास वर्ग.
    • मुकुंदाचार्य पुरस्कार २६ जा २००६.
    • स्वामी स्वरुपानंद यांच्या श्रुतीसागर आश्रम फुलगांव तर्फे डोंबिवली येथे आद्य शंकराचार्य पुरस्कार १५ मे २०१३ रोजी देण्यात आला.
    • छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर, यांच्या तर्फे जिजामाता विद्वत पुरस्कार व पूजन दी १८ जून २०१६  रोजी करण्यात आले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रु एकावन्न हजार असे त्याचे स्वरूप होते.

    प. पू. काकांचे कार्य :-

    • शुद्ध परमार्थ लोकांपर्यंत नेणे.
    • वेदान्तशास्त्र सांगणार्‍या ग्रंथांची निर्मिती करणे, तसेच नियतकालिकांमधून परमार्थपर लेख लिहिणे.
    • परमार्थाविषयी जनमानसांत रूढ असलेल्या गैरसमजुती दूर करणे.
    • शुद्ध परमार्थ, परमार्थ शास्त्र, संतविचार व साधना सर्वांपर्यंत नेऊ शकणारे अनेक प्रवचनकार व लेखक तयार करणे.
    • मुमुक्षूंना त्याच्या ध्येयाप्रत नेणे व सर्वच साधकांना प्रगतीचा मार्ग दाखवणे.
    • विविध अद्वैत संप्रदायांतील वरकरणी दिसणारा भेद व त्यांमुळे निर्माण झालेला भेदभाव दूर करणे.
    • स्वतः आचरून इतरांना साधना, वैराग्य, अनासक्ती यांचा धडा घालून देणे.
    • तीसपेक्षा अधिक वेदांतप्रचुर ग्रंथांची निर्मिती.
    • विविध ठिकाणी दिलेली बारा हजारच्या वर प्रवचने.
    • जगभर विखुरलेल्या साधकांना मार्गदर्शनाच्या निमित्ताने भारतभर व परदेशात केलेला प्रचंड प्रवास.
    • जीवन विकास, सज्जनगड, प्रसाद, भक्तियोग, पंढरीसंदेश इत्यादी नियतकालिकांतून केलेले विपुल लेखन.
    • अनेक पुरस्कार आणि सन्मानपत्रे.