Quotes

From the blog

कर्मविपाक

More Blog Articles

Upcoming Events

  • No events
  • विकास जीवनाचा

    Posted on July 2, 2016

    90.00

    अत्यंत वेधक आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ असलेल्या ह्या ग्रंथात प. पू. डॉक्टर श्रीकृष्ण द देशमुख यांनी स्वामी विवेकानंदांचे अत्यंत वेगळ्या शैलीने लिहिलेले चरित्र व अध्यात्मशास्त्रावरील काही लेख ह्यांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य पूर्वी जीवन विकास ह्या श्रीरामकृष्ण मठाद्वारे प्रकाशित होणार्‍या मासिकात प्रसिद्ध झाले आहेत.

    प्रस्तावना

    श्रीगणेशाचा कृपाहस्त मस्तकी आणि श्रीशारदेचे वास्तव्य जिव्हाग्री असा दुहेरी शुभविद्दायोग ज्यांना लाभला आहे, त्या परमपूज्य डॉ. काकांच्या वाङ्गमयक्षेत्राची समृद्धी वाचकाला थक्क करते. त्यांच्या श्रीचरणी तो नकळतच नतमस्तक होतो. लोकसंग्रहाचे प्रारब्ध घेऊन येणार्‍या सत्पुरुषांकडून भगवंत स्वत:ची दोन कामे करवून घेतो. पहिले काम ते देहात असेपर्यंत, त्यांनी वैखरी वाणीने जनांचे उद्बोधन करावे, दुसरे काम म्हणजे त्यांनी अक्षर वांग्ड्मयाची निर्मिती करावी, म्हणजे ते देहात असतांना व नसतांनाही हे जानोद्धार कार्य सुरू राहते.
    संत ज्ञानोबा-तुकोबा यांच्या विग्रहांचे दर्शन आपल्याला झालेले नाही. त्यांच्या केवळ वांग्ड्मयीन मूर्तीची दर्शने आपण घेत असतो. पण त्या परंपरेतील परमपूज्य डॉक्टर काकांच्या दोन्हीही रूपांची दर्शने घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. त्यांच्या वांग्ड्मयीन रुपाचे दर्शन, किती भव्य-दिव्य आहे, हे लोकांपुढे आणण्यासाठी, श्रीकृपा प्रकाशन “विकास जीवनाचा’ हे एक नवीन पुस्तक आपल्या समोर ठेवीत आहे. ह्या संस्थेची माझ्याकडून अपेक्षा आहे की मी त्याची प्रस्तावना लिहावी. ह्या प्रस्तावनेच्या द्वारे, त्या भव्य-दिव्यतेचा साक्षात अनुभव मला घडवावा हा त्या संस्थेचा सदहेतू मला प्रस्तावना लिहिण्यास उद्दुक्त करीत आहे. त्याच भाग्याला मोहित होऊन मी ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते . प पू काकांच्या ग्रंथांना प्रस्तावना लिहावी. ह्या प्रस्तावनेच्या व्दारे,त्या भव्य-दिव्यतेचा साक्षात अनुभव मला घडवावा हा त्या संस्थेचा सद्हेतु मला प्रस्तावना लिहिण्यास उद्युक्त करीत आहे. त्याच भाग्याला मोहित होऊन मी ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. प पू काकांच्या ग्रंथांना प्रस्तावना लिहिण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे असे नाही, तरीही पहिल्या वेळे इतकेच याहीवेळी छातीत धडधडते आहे, याचे कारण ही तसेच आहे. ते म्हणजे, त्यांच्या वांड्गमयाच्या उदात्ततेची ऊंची आणि माझ्या बौद्धिक कुवतीची ऊंची यांतील महदंतर. ती उदात्तता वाढतेच आहे, आणि त्या पाहिल्याच पातळीवर ‘मम प्रज्ञा प्रतिष्ठिता ’ आहे. अस्तु!
    प.पू. काकांच्या वांड्गमयीन दालनात आजमितीला त्यांचे स्वतंत्रपणे लिखित २१ आणि संपादित ग्रंथ ४ विराजत आहेत. साधारणपणे इ.स. १९८० पासून, इ.स.२००९ पर्यंत च्या काळात श्रीरामकृष्ण मठ, नागपूर द्वारे प्रकाशित होणार्‍या ‘जीवन-विकास ’ या मासिकात प पू काकांचे विविध विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते वेगवेगळ्या अंकांत आणि बर्‍यांच दिवसांपूर्वीही प्रसिद्ध झालेले असल्याने, मासिकाच्या नियमित वाचकांच्याही स्मरणात आज असतील असे खात्रीने म्हणता येत नाही. मासिकांचे वाचक नसलेल्यांबद्दल तर बोलणेच नको. या सर्वांसाठी, ते सर्व बहुमोल लेख एकत्रितपणे, आणि तेही आज उपलब्ध करून देण्याचे महत्कार्य श्रीकृपा प्रकाशनाने हाती घेतले आहे. फलस्वरूप ‘ विकास जीवनाचा ’ हा तीस लेखांचा संग्रह आज आपणापुढे प्रस्तुत केला आहे. या संस्थेला धन्यवाद द्दावेत तेवढे थोडेच आहेत.
    या लेखांपैकी प्रथम सहा लेखांची ‘महाभाग्यवान विवेकानंद ’ ही मालाच आहे. नंतरच्या चोवीस लेखांचा अनुक्रम अशा प्रकारचा आहे की, प्रत्येक पुढील लेख वाचकाला त्याच्या पुढील जीवनाचा उत्तरोत्तर विकास साधण्याची सामग्री पुरवितो. जीवनाच्या विकासाची परम सीमा सर्वदु:खातीत आणि केवळ आनंदरूप स्थिति, अशी जीवनमुक्ती आहे. या संग्रहातील शेवटचा लेख ‘जीवन्मुक्ता’ हाच आहे. बर्‍याच प्रमाणात निरीश्वरवादाकडे झुकलेल्या किंवा ईश्वरा विषयी सदोष आणि अस्पष्ट संकल्पना असणारा श्रीरंग आणि स्वत: लेखक यांच्यातील ‘ सागरतीरी ’ हा अत्यंत हृद्द व डोळ्यात अंजन घालणारा लेख, विवेकानंद-मालेनंतर या संग्रहातील प्रथम लेख आहे. मनुष्य जीवनात त्याच्या विकास अवस्थेत अत्यंत अज्ञानमूल टप्प्यापासून निजबोध टप्प्यापर्यंतच्या प्रवासातील विकासाचे सर्व टप्पे या सर्व लेखांनी सुस्पष्ट केलेले आढळतील, त्यामुळे वाचकाला आपण कोणत्या टप्प्यावर आहो हे जाणवून, तेथून पुढील विकास प्रवास आरंभण्यासाठी यात मार्गदर्शन उपलब्ध आहे. म्हणूनच ‘ विकास जीवनाचा ’ हे या पुस्तकाचे नामाभिधान अत्यंत आशयगर्भ झाले आहे. शिवाय, श्रीरामकृष्ण मिशनच्या ‘जीवन-विकास ’ या मासिकातून मिशनच्या सौजन्यानेच हे सर्व लेख निवडलेले असल्यामुळे देखील हे नामाभिधान अधिकच यथार्थ वाटते.
    यानंतर प्रत्यक्ष लेखांविषयी थोडेसे लिहून प्रस्तावनेला न्याय देते. प्रथम सहा लेखांमध्ये, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी नेमकेपणाने प पू काका लिहितता, “स्वामींचा विकास-दृष्टीने प्रारंभी भर, शरीराचे बाह्य आरोग्य, सौष्ठव, तेजस्वीपणा यांवर आहे. नंतर ते अंतरंग सौंदर्यावर भर देतात.’ हा आशय स्पष्ट करतांना लेखक म्हणतात- ‘असामान्य मानवाचे असामान्यत्व त्याला सुरूपाने मुग्ध करते आणि विरुपाने स्तब्ध करून त्या दोन्हीच्या पाठीमागे दडलेले अरुप दाखवून देते.’ पूर्ण लेख मालेत, नाशिवंत दृश्य पसार्‍याचा अर्थ जाणून स्वामी विरक्त-संन्यस्त झाले, आणि त्याच पसार्‍यातील वासुदेव पाहून त्या वासुदेवाच्या व्यक्तीकरणासाठी जन सामन्यांच्या उद्धारार्थ ते कर्मयोगी झाले. आणि तरीही, शेवटच्या क्षणापर्यंत आत्मभान कधी विसरलेच नाहीत. हाच स्वामींचा जीवनपट आहे आणि सहा लेखांमध्ये अत्यंत कौशल्याने प.पू. काकांनी तो विणला आहे.
    सागर किनार्‍यावरून बाजूच्या जगात प्रवेश करतांना, ‘माहिती आणि ज्ञान’ विषयी लेखक बोलताहेत, ‘ जगाचे व्यवहारात होणारे ज्ञान, बुद्धी सापेक्ष आणि इंद्रिय सापेक्ष आहे म्हणजे बुद्धी व इंद्रिय यांनीच ते होते. हे सर्व ज्ञान माहितीरूप आहे पण ध्यानकाळी यांच्या शिवाय सत्य स्पष्ट होते. सत्याचा हा बोध म्हणजे ज्ञान, असा मार्मिक खुलासा या प्रकरणात येतो. व्यवहारात होणारे सर्व महितीरूप ज्ञान आपल्याला व्यवहारासाठी उद्दुक्त करते. सर्व व्यवहार तेव्हांच यशस्वी होतो जेंव्हा आपले वर्तन अंत:प्रेरणेप्रमाणे चालते. हीच प्रेरणा, आध्यात्मिक उन्नतीलाही जबाबदार आहे. ह्याच प्रेरणेला ‘स्वयंसूचना’ समजावे. तिचा प्रत्यक्ष संबंध ईश्वराशीच आहे. स्वत: ब्रह्मरूप असल्याचा अनुभव येण्यासाठी, जिवाने स्वयंसूचनेचा अवलंब करावा असे लेखक ‘आध्यात्मिक स्वयंसूचना ’या लेखात म्हणतात. ‘सत्य’ हे प्रकरण सांगते की ज्ञान सत्य आणि भ्रम या दोन रूपांनी आपल्यापुढे असते. सत्य ज्ञान बदलत नाही, तर भ्रमातील ज्ञान बदलत राहते. सत्य ब्रहमासंबंधी आहे तर भ्रम दृश्यविश्वा संबंधी आहे. ‘बेरजेचे अध्यात्मकारणात, प पू काका बोलतात, ‘ जीवाला शक्तीच्या आधाराने, शिवाशी ऐक्य साधावयाचे असेल तर त्याला भक्ति शिवाय दूसरा मार्ग नाही. यातील ‘साधणे ’ हे क्रियापद शक्तिसूचक आणि ‘भक्ति’ हे पद शिवसूचक आहे. परमभक्ति हेच शिवाचे स्वरूप! येथील भक्त शब्द ‘विभक्त’ नसणे – शिवापासून विभक्त नसणे या अर्थाने समजावा. विविध मतांच्या आधाराने तत्वस्पष्टीकरणार्थ काय सहाय्य मिळते हेच पहात राहणे व ‘परि मज आत पैसो दिठी तुझी ’ या वाळणाची साधना करणे हीच अध्यात्मकरणची बेरीज होईल, आणि संप्रदाय व पंथोपपंथ यांचे परस्पर सामंजस्य राहील. हेच ‘बेरजेचे अध्यात्मकरण’ आहे. शरीर हे प्रथम घर. ते ज्या भिंती, छप्पर वगैरेच्या रूपात राहते ते एक घर. पृथ्वी हे ही एक घर. ती ज्याचा घटक आहे ते विश्व ते ही एक घर आणि हे ही सर्व ब्रह्मांड ज्याच्या अंगभूत तो साक्षात ईश्वर (ईश्वर – ब्रह्म समजावे ) अशी पाच घरे प्रत्येक जीवाला आहेत, हा मोलाचा विचार “जिवाची पाच घरे’ मधे आपल्याला करता येईल. ‘एक जीवननिष्ठा’ आपल्याला शिकविते, सामान्य जीव अनेक व्यावहारिक निष्ठा जोपासतो आणि सतत फजिती चा अनुभव घेतो. असे न व्हावे म्हणून त्याने फक्त ईश्वर निष्ठ असावे. ‘खेळा ऐसा प्रपंच मानावा’ असे झाल्यास ईश्वर रचित खेळामध्ये’ ईश्वराकडे दृष्टी ठेवून खेळल्यास ईश्वरालाही त्याचे स्वत:चे नियम पाळावेच लागतात. म्हणजे तो सद्गुरुंशी गाठ घालून देतो. आणि तो आपल्या हिताचे साधतो.
    पुढील काही प्रकरणांत क्रमाने परमार्थाच्या वाटचालीत, ‘समाधी साधन ’ समजावून घ्यावे. ज्या ‘मी’ शी आपला अहोरात्र संबंध आहे, त्याचे स्वरूप ओळखून घ्यावे. कर्मफल त्याग हे उत्तम साधन समजून घ्यावे. संपूर्ण पारमार्थिक प्रवासात ‘ प्रस्थान त्रयी’ हे पाथेय जवळ ठेवावे. अंत:करण चतुष्टय समजून घेतल्या खेरीज ‘मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिम निवेशय’ हे ‘आध्यात्मिक मानसशास्त्र’ उमगत नाही, आणि ईश्वर दर्शनाचा मार्ग’ प्रशस्त होत नाही. हे सर्व करतांना विवेक दुबळा असल्यास आनंदाचा लाभ अवघड आहे. असे उत्तम मार्गदर्शन, प्रकरण वीस पर्यंत आले आहे.


    हे सर्व लेख प पू डाँ श्रीकृष्ण द देशमुख लिखित असुन साधकांनी केवळ व्यक्तीगत अभ्यासाकरीता त्यांचा वापर करावा.

    Blog Search